- खांद्यांचे प्रत्येक दुखणे हे फ्रोजन शोल्डर असते का?
– कोविड महामारी,वर्क फ्रॉम होमनंतर फ्रोजन शोल्डर या आजाराच्या समस्या वाढल्या आहेत. पण खांद्याचा प्रत्येक आजार म्हणजे फ्रोजन शोल्डर नाही…हे समजून घेणे आवशयक आहे. खांदेदुखी च्या कारणांमध्ये खांद्यांच्या स्नायूंना इजा होणे (रोटेटर कफ टिअर),कॅल्शियम जमा होणे (कॅल्सीफिक टेंडीनाईटीस),खांद्यांमधील हाडांची वाढ होणे (एमपींजमेंट) ,संधिवात (शोल्डर आर्थरायटिस) यांसारख्या समस्या दिसून येतात.त्यामुळे खांदेदुखीचे योग्य निदान होणे गरजेचे आहे.
- खांद्यांच्या सांध्याची रचना कशी असते?
– खांदा हा तीन हाडांनी बनलेला असतो.आर्म बोन (दंड),शोल्डर ब्लेड व कॉलर बोन ने जोडून खांद्याचा सांधा तयार होतो.शरीरातील सांध्यामध्ये सर्वाधिक हालाचाली, खांद्यामध्ये होत असतात. मोबिलिटी अॅट द कॉस्ट ऑफ स्टॅबिलिटी असे ह्याचे वर्णन करण्यात आले आहे.
- फ्रोजन शोल्डरमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात?
– फ्रोजन शोल्डर समस्येमध्ये,खांद्यांमधील हालचाली हळूहळू कमी होऊन खांदा आखडून जातो व नंतर या वेदना अधिकाधिक तीव्र होऊ लागतात. महिलांना केस विंचरताना, कपडे घालताना, पुरूषांना वॉलेट काढताना, कार चालविताना ,हात मागे घेताना त्रास होतो. फ्रोजन शोल्डरमध्ये रात्री खांद्यांमध्ये तीव्र वेदना होऊ लागतात आणि दंडाच्या ठिकाणी दुखू लागते.